जीवन जलद,विचार संथ,
विचार जलद तर जीवन संथ,
अश्या विसंगती अटकविती प्रगतिपन्थ.
शोधावा गुरु अंतःकरणात,
प्रगतीपंथाला हवी लय वेगाची,
जीवन शैली अन विचारांची,
लयच्या 'किनारी' दुधारी,
सांगड घालतांना सुडीत सुपारी,
निश्चय पक्का असला जरी,
अडथळ्यांचा डोंगर डोक्यावरी,
अडचणींवर करावी मात,
जलद नि संथ,''मध्याची' द्यावी साथ,
'मध्य'ला असावे मार्गदर्शन,
दिशेचे असावे अवलोकन ,
स्थिरता असावी पसाभर,
समाधान म्हणजे दुधात साखर,
प्रगतीला नसे रुपरंग,
परी उठून येई प्रतिबिंब,
प्रतीबिम्बाच्या छबिचे प्रतीरोपण,
ध्येयाच्या चौकटीत तिचे कोंदण,
आरोग्य,संतती,संपती,लौकिक जनी,
चौकट असे चारकोनी.
अविकल्प.
विचार जलद तर जीवन संथ,
अश्या विसंगती अटकविती प्रगतिपन्थ.
शोधावा गुरु अंतःकरणात,
प्रगतीपंथाला हवी लय वेगाची,
जीवन शैली अन विचारांची,
लयच्या 'किनारी' दुधारी,
सांगड घालतांना सुडीत सुपारी,
निश्चय पक्का असला जरी,
अडथळ्यांचा डोंगर डोक्यावरी,
अडचणींवर करावी मात,
जलद नि संथ,''मध्याची' द्यावी साथ,
'मध्य'ला असावे मार्गदर्शन,
दिशेचे असावे अवलोकन ,
स्थिरता असावी पसाभर,
समाधान म्हणजे दुधात साखर,
प्रगतीला नसे रुपरंग,
परी उठून येई प्रतिबिंब,
प्रतीबिम्बाच्या छबिचे प्रतीरोपण,
ध्येयाच्या चौकटीत तिचे कोंदण,
आरोग्य,संतती,संपती,लौकिक जनी,
चौकट असे चारकोनी.
अविकल्प.