जुळवून तारा सूर गुणगुणावे
शाम मखमली शाली वरले
कोंदण चंदेरी पाहतच रहावे
अन असे …
आभाळाशी जुळले नाते.
फुटता तांबडे केसरी सड्यात न्हावे
हजार हिरव्या हातांच्या कुशीत दडावे
सोनेरी किरणांचे जाळे पहातच रहावे
अन असे …
आभाळाशी जुळले नाते.
झुळूक वार्याची उगाचच बटांशी खेळे
मग हास्य गुलाबी संध्येचे घेई कवडसे
बक्माळेचे गुंफण साजरे पहातच रहावे
अन असे …
आभाळाशी जुळले नाते.
माजलेले कोलाहल सुख-दुःखाचे शमवावे
कधी गोड हितगुज करावे
कधी सुन्न होऊनी पहातच रहावे
अन असे …
आभाळाशी जुळले नाते.
काळे-करडे नैराश्य ढगांवर पसरे
मोदाचे रंग-कलश तयांवर ओतावे
कोरलेले रिमझिम पावसांतील अंतरंग पहातच रहावे
अन असे …
आभाळाशी जुळले नाते.
अविकल्प