Saturday, November 29, 2025

     Memoires of life 

 पर्यटन अतिशय आनंद देणारा शब्द, ना उद्देश किंवा बहुउद्देशीय प्रवास दोघेही  आहेत.चौकसपणे प्रवास करणारे क्षण नि क्षण निरक्षण करीत अनुभव घेत असतात. पर्यटन वाकचातुर्य, स्वावलंबन,योग्य तडजोड,स्वयंशिस्त,तत्परता,आयोजन शिकवते. शहर व ग्रामीण जीवनातील फरकाचे दर्शन घडविते. निसर्गाशी नाते जुळविते. ऐतिहासिक जगात फिरवून आणते. वैज्ञानिक संशोधनाचे स्वरूप दाखविते. अध्यात्माची ओढ लावते. धाडसी व साहसी प्रवृत्ती वाढवते. पर्यटन कटू,गोड अनुभवाची शिदोरीच आपल्याला बहाल करते.शेवटी काय तर आपल्या संस्कृतीत सांगितल्या प्रमाणे 

"केल्याने देशाटन पंडित, मैत्री,सभेत संचार| 
शाश्र,ग्रंथ विलोकन मनुजा येतसे चातुर्य फार|"

                                 अविकल्प...  

Friday, November 14, 2025

Memoires of life      

        बालपणाच्या आठवणी हा असा एक अल्बम आहे कि जो जगातील प्रत्येक व्यक्तीच्या जवळ जपलेला

आहे व्यवहारातील जबाबदार्यांच्या बोझ्या खाली माणूस जेव्हा गुदमरतो,कामाने थकतो,चिंतेने व्याकूळ होतो,नितनव्या त्रागाने

त्रासून जातो आणि अश्या वेळी त्याच्या अशांत मनाला हा अल्बम नुसता चाळला जरी तरी तेवढां वेळ सुटकेचा श्वास घेत  येतो

आपल्या आपल्यातच रममाण होतो. त्या आठवणींच्या फोटोकेस मध्ये कटू-गोड कुठलीही आठवण त्याच्या साठी आनंदाचा क्षण घेऊन येते  आठवणीतील प्रसंगात असलेली व्यक्ती तेवढ्या वेळेसाठी त्याच्या समक्ष उभी ठाकते किंवा ते स्थळ तो प्रसंग जिवंत

उभा असतो. एखादया प्रसंगातील वस्तू किंवा भेटवस्तू कालांतराने परत हाताशी लागली तर लगेच डोळे विस्फारून ती व्यक्ती

तिच्या कडे बघत राहते . ती वस्तू त्या व्यक्तीला परत त्या प्रसंगाची आठवण करून देते. बालपणाच्या जगात फिरवून आणते.

आणि हि छोटीशी  स… फ… र  त्या व्यक्ती साठी रोजच्या धकाधकीच्या जिवनात काही क्षण विश्रांतीची,तरतरीची, आनदाची,

असते.