अहिराणी कविता
सोर्ग (स्वर्ग)
सोर्ग (स्वर्ग)
भलती मोठ्ठी धल्डी बोय,माहीत नई तिले तिन वय,
राह्य पिपय ना खाले,कटाई गई ती जिवले,
रोज सांगे देवले,कटाई गवू मी,लई जाय माले,
देव काई ऐकेना,बोय ले चैन पडेना.
तिना वाकेल व्हता पाठींना कना,तोंडमा जाईना पानी ना दाना,
कायी अंधारी रातले,आजली गयी जीव देवाले,
घरना जोडे व्हती आड़,लागेल नव्हता तिले रहाट,
देवन नाव ल्हीसन कुदनी त्यानंमान,
भपक अंधार डोयामा मायना,
सकायले गोंधय उठना ना घर मान,
आजली नं बोचकं दिखनं नयी खाटलांम्हानं ,
धुंडाले लागनातं पोरे सोरे,एक न ध्यान गय हिर व्हरे ,
देखी लउ त्यानं मान,मनले संतोस,
समदा करवा लागनात आक्रोस ,
समदा गया देखाले, धल्डी व्हती कपारीले ,
खटली ले दोर बांधीसन काढी तिले ,
बट्ठना मंग समदा इचाराले ,
आते तिनी गोट ऐका गड्यास्नो ......
जागा नई आठे,कोठे ठिऊ तूले,देव म्हने माले,म्हनुसन धाडी दिधी खाले,
सोर्ग देखीसन उनु मी,देवले भेटीसन उनु मी,
रंगाई सन सांगे पाप-पुण्यनी, नरक-सोर्ग नी गोट,
बात काय सांगू तुमले चालस तठे दुधनी मोट,
खावाले शिरा - पुरी,चांदीन ताट,
पीवाले बत्तासान दूध,बठाले चंदननं पाट,
वावरम्हानं उगस मोती-पव्या,
तिजोरीले नैत तठे कुलूप-किल्या ,
राव्हाले महेल,फिराले रथ,आंग भरिसन दागं,समदं व्हतं तठे,
पन जागा नयी माले,म्हनून परत उनु आठे,
हायी समदी गोट पसरनी गावभर,जाई पडनी पाटीलना कानवर,
पाटील व्हता जुवानं, डोकं त्यानं भलतं बलवान,
हाई बात लागी गयी त्याना जिवलें,निवत धाड समन्दा धलड्डा - धल्डीस्ले ,
शिरा-पुरी,चांदीन ताट,बत्तासानं दूध,चंदननं पाट,
देखीसन हाऊ समदा थाट,भरायी उना डोयांना काठ,
आशीर्वाद दिसन तोंडभर, धल्डी सांगे गांवभर ,
सोर्ग मना आठे, गावं मना आठे,मंग कसाले जाऊ मी तठे.
अविकल्प
ReplyForward
|