Sunday, May 12, 2013

जुळवून तारा सूर गुणगुणावे
शाम मखमली शाली वरले
कोंदण चंदेरी पाहतच रहावे
     अन असे …
             आभाळाशी जुळले नाते.

फुटता तांबडे केसरी सड्यात न्हावे
हजार हिरव्या हातांच्या कुशीत दडावे
सोनेरी किरणांचे जाळे पहातच रहावे
     अन असे …
             आभाळाशी जुळले नाते.

झुळूक वार्याची उगाचच बटांशी खेळे
मग हास्य गुलाबी संध्येचे घेई कवडसे
बक्माळेचे गुंफण साजरे पहातच रहावे
     अन असे …
             आभाळाशी जुळले नाते.

माजलेले कोलाहल सुख-दुःखाचे शमवावे
कधी गोड हितगुज करावे
कधी सुन्न होऊनी पहातच रहावे
     अन असे …
             आभाळाशी जुळले नाते.

काळे-करडे नैराश्य ढगांवर पसरे
मोदाचे रंग-कलश तयांवर ओतावे
कोरलेले रिमझिम पावसांतील अंतरंग पहातच रहावे
     अन असे …
             आभाळाशी जुळले नाते.

                                                       अविकल्प

No comments:

Post a Comment