Friday, July 1, 2016

             कोमल शब्दांच्या पाकळ्या

कोमल शब्दांच्या पाकळ्या तिने उद्गारल्या,
घ्या हो फूले घ्या,माझी सूंदर फूले घ्या.

रंगीत राशी रानफुलांच्या ,
नाजुक हातांनी वेचून आणल्या,
भरूनि परडित माझ्या,
घ्या हो,फुले घ्या,माझी सूंदर फुले घ्या.

मंद सुवास फुलांचा मोहून घेईल मनाला,
टोचणार नाहीत काटे,अलगद लावा सदर्याला,
हळूच मग नाजुक स्पर्श हृदयाला,
घ्या हो फुले घ्या, माझी सूंदर फुले घ्या.

गंध कोषावर पहारे होते बघा भुंग्यांचे,
सौंदर्य साधन होते ते फुलपाखरांचे,
नज़र चुकवून ही आणलीया,
घ्या हो, फुले घ्या,माझी सूंदर फुले घ्या.

बकुळीे मोगर्याच्या माळl की गजरा,
काळया भोर सम्बारवर,दिसेल की साजरा,
दर्वळलेल्या आसमंताचा स्वाद घ्या
घ्या हो फुले घ्या,माझी सूंदर फुले घ्या.

मखमली स्पर्श होता,हरपते भान हे,
होऊन धुंद तयात लावून घ्या हे छंद हे,
गुपित लळा लावतील कळ्या ह्या,
घ्या हो फुले घ्या,माझी सूंदर फुले घ्या.

कमलदल करा अर्पित नारायणा,
लालबुंद जास्वन्द प्रिय श्री गजानना,
गाभाऱ्यात सजवा धवल पाकळ्या,
घ्या हो फुले घ्या,माझी सूंदर फुले घ्या.
                                   अविकल्प







1 comment: