Memoires of life
पर्यटन अतिशय आनंद देणारा शब्द, ना उद्देश किंवा बहुउद्देशीय प्रवास दोघेही आहेत.चौकसपणे प्रवास करणारे क्षण नि क्षण निरक्षण करीत अनुभव घेत असतात. पर्यटन वाकचातुर्य, स्वावलंबन,योग्य तडजोड,स्वयंशिस्त,तत्परता,आयोजन शिकवते. शहर व ग्रामीण जीवनातील फरकाचे दर्शन घडविते. निसर्गाशी नाते जुळविते. ऐतिहासिक जगात फिरवून आणते. वैज्ञानिक संशोधनाचे स्वरूप दाखविते. अध्यात्माची ओढ लावते. धाडसी व साहसी प्रवृत्ती वाढवते. पर्यटन कटू,गोड अनुभवाची शिदोरीच आपल्याला बहाल करते.शेवटी काय तर आपल्या संस्कृतीत सांगितल्या प्रमाणे
"केल्याने देशाटन पंडित, मैत्री,सभेत संचार|
शाश्र,ग्रंथ विलोकन मनुजा येतसे चातुर्य फार|"
अविकल्प...
No comments:
Post a Comment