मी सावरली अन ती बावरली, ।।
कारण ......मधूनच एक मंद झुळूक डोकावली ,
स्पंदने वेधली तिने अन लाजवली ,
येउन जवळ हळूच पुटपुटली ,
माझ्याशीही मैत्री करना सखिलि ,
केला इशारा मज जातेवेळी ,
भेटण्याची वेळ ठरली कातरवेळी ,।।
हळूच मग .....एक सर पाकळी वरून ओघळली ,
दवबिंदूनी ती होती भिजली ,
नाजूक तिच्या गोड हालचाली ,
मादक सुगंधाने ती मोहरली ,
सहज ती हसता खुलली खळी ,
न्याहळता तिज बुजरी झाली ,।।
क्षणात ......इन्द्रधनुतुन रंगबिरंगी काशिद्याच्या शाली ,
ओढलेल्या पतंगाने झेप घेतली ,
किती ग विलोभनीय म्हणून कुजबुजली ,
गुजगोष्टींची हि रास लागली ,
घेऊन हातात हात दिली टाळी ,
स्वर तालात -मोलात न्हायली ,।।
जुळले शब्द गुंफल्या माळी ,
घालून गळ्यात गिरकी घेतली ,
अन .....संगतीला थव्यांनी खग भरून आली ,
लाजऱ्या लतेच्या पापण्या स्पर्शाने मिटल्या ,
राजस चिमुकली खोप्यात विसावली ,
देऊन मजसी अलिंगन झुळूक कानवली
म्हणाली भेटण्याची हीच तर कातरवेळी .
मी सावरली अन ती बावरली .
अविकल्प .
Avin Ramaiya
No comments:
Post a Comment