बावरे मन
कान्हाची मुरली वाजली बनात.
गुंजले सूर राधेच्या कानात ,
बावरली ती जाग स्वप्नात ,
का छळसी मज,कुजबुजे मनात ||1 ||
नयन सावरे शाम- शोधात,
धडकती स्पंदने स्व ऊरात,
बटही उलझते बेभान ||२||
पाय थिरकती चालनात,
पैंजण वाजती तालात,
कंगन किणकिणती नादात ||३||
घागर्याचा घोळ झोकात,
ओढणीने धरला वार्याचा हात,
शुद्ध हरपलेल्या शिल्पात ||४||
जिवंत संगीत हे लहरीत,
भारावले वेणुने आसमंत,
मुक्त बावरे मन बंधनात ||५||
No comments:
Post a Comment