Wednesday, October 31, 2012

निसर्गराणी
असावी कळी जंगलातली मी,
रानपाखरे मज सवंगडी,
झुळूक वार्याची गुदगुल्या करी,
फुलपाखरे काढती खोडी जरी, 
असावी कळी जंगलातली मी ||     
सुंदर मनोहर रूप निरागस,
बागेतली शोभा आल्हादक ,
डोलावती माना सौंदर्य उपासक,
पण उमलता कळी व्हावे घातक, 
असावी कळी जंगलातली मी ||
उमलले जरी वनराईत मी,
वनराणी मज जीवनरक्षी,
वार्यासंगे घेईन भरारी,
मोकळ्या आकाशी होईन फुलोरी,
असावी कळी जंगलातली मी ||
आवडेल मज तरी हा आदर्श,
जग पालनहारचा करावया पदस्पर्श
वां गुंफल्या माळा जरी,
जन्म सफल होईल अंती,
असावी कळी जंगलातली मी.||

अविकल्प

No comments:

Post a Comment