मन माझे फुलपाखरू ,
रंगबिरंगी कलाकुसरी ,
अति चंचल,अति कोमल,
कधी या फुलावर ,
कधी त्या फुलावर ,
भिरभिरते गोड आठवणीवर ,
सुंदर फुलांचे रंग सुंदर ,
सुगंध फुलांचे मोहक,मोहक ,
तयांची नक्षी मज पंखावर ,
पंख माझे अति तलम ,
नाहले ते पुष्प दर्प ,
प्रलोभनाची नसे आस ,
हेलकावे वार्यासंग ,
सरगम छेडे लहरीत ,
रुष्टतेत नसे रस ,
मदनमस्त मोदात ,
शोधते मधुर मध ,
वाटण्या सर्वां रुचकर अविट .
अविकल्प ।
No comments:
Post a Comment