। अंगाई गीत ।
बाळा ऐकून घे अंगाई ।
लावली हि सीडी तुझ्या स्तवी ,
वेळ न मज जवळ तुझ्यापरी ,
बाळा ऐकून घे अंगाई ।
वेळ ही झाली किटी-पार्टीची ,
मेकअप न संपला अजून तरी ,
बाळा ऐकून घे अंगाई ।
दुग्धपान करण्या दिली बॉटलहि ,
तुझ्यासव खेळण्या दिली खेळणीही ,
बाळा ऐकून घे अंगाई ।
तुझ्या संगोपना ठेवीन दाई मी ,
अथवा होईन आश्रित बेबीसिटरची ,
बाळा ऐकून घे अंगाई ।
वेळ न उरला तुला भरविण्या जरी ,
हॉटेलातील सिझेलर थंड होई तरी ,
बाळा ऐकून घे अंगाई ।
वेळ हि झाली सिनेलागणीची ,
डायनासोर हि स्थिरावले सिने गृहातही ,
बाळाऐकून घे अंगाई ।
दे शुभेच्छा मज नाबाद जॉकी साठी ,
उद्या पर्यंत होईन तुझी उतराई ,
बाळा ऐकून घे अंगाई ।
No comments:
Post a Comment